राज ठाकरे यांनी सरकारविरोधात बोलू नये यासाठी 'ईडी'चा बडगा

Foto

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याने भाजपामध्ये चिंतेचे वातावरण आहे. सक्‍तवसुली संचलनालयाच्या (ईडी) सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांना लवकरच समन्स बजावण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात हा समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. कोहिनूर मिल क्रमांक ३ विकत घेण्यात राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर आहेत.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी विरोधात प्रचार करूनही भाजप-शिवसेना युतीला काही फटका बसला नव्हता. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे मोठा प्रभाव पाडू शकतात. यामुळे त्यांची राजकीय कोंडी करण्याच्या दृष्टीने भाजप-सेना सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेना सरकारविरोधात बोलू नये आणि दबावात रहावे, यासाठीच ही कारवाई केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker